अज्ञात कारने ठोकरल्याने एकजण जखमी झाल्याची घटना सातारा-कास रस्त्यावर घडली.
सातारा : अज्ञात कारने ठोकरल्याने एकजण जखमी झाल्याची घटना सातारा-कास रस्त्यावर घडली.
सातारा-कास रस्त्यावर पायी चालत निघालेल्या विलास मारुती ढवळे (वय 56, रा.सांबरवाडी पो.यवतेश्वर) यांना अज्ञात कारने उडवून जखमी केले. ही घटना दि. 10 रोजी घडली असून याप्रकरणी विशाल ढवळे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.


