maharashtra

जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यश

Two robbers arrested
येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रक चालकाला विनाकारण शिवीगाळ दमदाटी करून त्याला मारहाण करून त्याच्याकडून १ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

सातारा : येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रक चालकाला विनाकारण शिवीगाळ दमदाटी करून त्याला मारहाण करून त्याच्याकडून १ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीमध्ये अहमदनगर येथील ट्रक चालकास विनाकारण शिवीगाळ, दमदाटी करून त्याच्या डोक्यात दगड मारून त्याच्या कडून जबरदस्तीने १ हजार ७०० रुपये काढून घेऊन पळून जाणाऱ्या लखन चंद्रकांत जाधव, रा. देगाव, ता. सातारा आणि हरीश आनंदराव देवगड, रा. गणेश कॉलनी, चंदन नगर, सातारा या दोघांना सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने पथकाने अटक केली.