maharashtra

कोळकी येथील घरफोडीत १ लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरीस


कोळकी, ता. फलटण येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १ लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : कोळकी, ता. फलटण येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून १ लाख ४७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ डिसेंबर रोजी १० ते दि. ५ डिसेंबर रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोळकी गावच्या हद्दीत अक्षत नगर येथील निलेश गणपत बोडके यांच्या राहत्या घराची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. घरात असलेल्या कपाटात ठेवलेले १ लाख ४७ हजार रुपये किमतीचे गंठण, अंगठी, रिंगा असा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.