सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटल, सातारा समोरील सार्वजनिक रस्त्यावर आकाश भगवान कदम, यश अमर कदम, संतोष शिवाजी मालकर (तिघेही राहणार खेड तालुका सातारा) आणि सुधीर सुरेश कोळी राहणार करंजे सातारा या चौघांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून आपसात भांडणे करून शांततेचा भंग केल्याप्रकरणी या चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.


