बावधन, अनपटवाडी येथे खानपट्टा, क्रशर परवानगी देऊ नये याबाबत वारंवार हरकत ठराव, निवेदन देऊनही वाई तहसीलदारांनी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला.
सातारा : बावधन, अनपटवाडी येथे खानपट्टा, क्रशर परवानगी देऊ नये याबाबत वारंवार हरकत ठराव, निवेदन देऊनही वाई तहसीलदारांनी परवानगी दिलेली आहे. त्यामुळे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला.
निवेदनात बावधन, अनपटवाडी, वाघजाईवाडी, म्हातेकरवाडी, शेलारवाडी येथील ग्रामस्थांचा नवीन खानपट्टा क्रशर चालू करण्यास हरकत असून परिसरातील सर्व शेतकरी, ग्रामस्थांनी तहसिलदार वाई यांना तक्रारी अर्ज करून देखील खानपट्टा, क्रेशर ला परवानगी मिळाली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अन्यथा शेतकरी, ग्रामस्थांना बेमुदत उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असे म्हटले आहे. निवेदनासोबत विविध ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा, मासिक सभेचे ठरावही देण्यात आले आहेत.


