महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 जुलै रोजी कोयना वसाहत कराड येथे बाथरुममधील लिकेज दाखवण्याच्या बहाण्याने महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी अमोल पवार राहणार ओगलेवाडी, कराड याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक फौजदार देशपांडे करीत आहेत.


