साडेदहा लाखांच्या फसवणूक प्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : साडेदहा लाखांच्या फसवणूक प्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुलै 2023 ते 21 ऑक्टोबर 2023 दरम्यान संदीप विष्णू संकपाळ रा. यादोगोपाळ पेठ सातारा, शिवाजी नामदेव शिंदे रा. सैदापूर, ता. सातारा, अनिता नितीन सावंत रा. कोरेगाव, ता. कोरेगाव आणि अक्षय अविनाश चव्हाण रा. कोंडवे, ता. सातारा यांनी दोन गुंठे जमीन देण्याच्या आमिषाने विश्वास संपादन करून, बोगस दस्त करून रोहित सिताराम कदम राहणार माजगावकर माळ झोपडपट्टी, ता. सातारा यांची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.


