maharashtra

नोकरीच्या आमिषाने १५ लाख रुपयांची फसवणूक

दोघांना अटक ; शहर पोलिसांची कामगिरी

Fraud of Rs 15 lakh for job lure
नोकरीचे आमिष दाखवून सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील एकूण १८ जणांची १५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात सातारा शहर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना यश आले आहे.

सातारा : नोकरीचे आमिष दाखवून सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील एकूण १८ जणांची १५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात सातारा शहर पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना यश आले आहे.
मारुती जयवंत साळुंखे रा. नरूटवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे आणि प्रवीण राजाराम येवले, रा. वडी, ता. खटाव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील दोघांनी रमेश पोपट धावरे रा. नरूटवाडी, ता. इंदापूर स्त्रियांना दहिवडी ते सर्व कार्यालय किंवा कोल्हापूर येथे शासकीय नोकरी लावतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी २० हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी वरील दोघांना अटक केली आहे. चौकशीमध्ये त्यांनी नोकरीचे आमिष दाखवून सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील एकूण १८ जणांची १५  लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची माहिती दिली आहे.