maharashtra

दोन तासात १०८ कि.मी. दत्तक रस्ता चकाचक

जिल्ह्यात डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून स्वच्छता अभियानाचा सातवा टप्पा

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा ता.अलिबाग) यांच्यावतीने भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ.सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात हजारो श्रीसदस्यांकडून सातव्या टप्प्यातील स्वच्छता अभियान उत्साहात झाले.

सातारा : जगभरात वृक्षारोपण वृक्षसंवर्धन, मनुष्य हीच जात आणि मानवता हाच धर्म, आरोग्य, व्यसनमुक्तीबरोबर पर्यावरण संतुलनासाठी स्वच्छतेचा संदेश देत समाजाला निरुपणाच्या माध्यमातून समर्थ वाङमयातील विचार देणारे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा ता.अलिबाग) यांच्यावतीने भारताचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ.सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात हजारो श्रीसदस्यांकडून सातव्या टप्प्यातील स्वच्छता अभियान उत्साहात झाले.
स्वच्छता राखणे सामाजिक कर्तव्य आहे, असे प्रत्येकाने ठरवून त्याप्रमाणे कृती करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात सर्वांमध्ये जनजागृती व्हावी, असा व्यापक, उदात्त विचार जनमानसात रूजवण्याचे अपूर्व कार्य प्रतिष्ठान करत आहे. स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवित हजारो श्रीसदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन महत्त्वपूर्ण योगदान दिले. दरम्यान किकली (ता.वाई) येथे कॅनॉल परिसरासह कुडाळमध्ये दफनभुमी परिसरात देखील स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्रतिष्ठानच्या या उपक्रमातुन सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला गेला. जिल्ह्यात १०८ किमीचा रस्ता दत्तक घेण्यात आला असून प्रतिष्ठानमार्फत स्वच्छता अभियान वर्षभरासाठी सुरू आहे. रस्त्यांवरील दुतर्फा संकलित केलेला कचरा टाकण्यासाठी सदस्यांच्या वाहनासह ग्रामपंचायत, नगरपालिकेद्वारे वाहनांची व्यवस्था होती. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते स्वच्छ करण्यात येत असून प्रतिष्ठानच्या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे. २५ ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू असून सातव्यांदा झालेल्या अभियानात २२८० सदस्यांकरवी ४७.१७ टन कचरा संकलन करण्यात आले. ठिकठिकाणी स्थानिक नागरिकही स्वंयस्फुर्तीने सहभागी झाले. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण, नारळवाडी, धोंडेवाडी, कराड, नहरवाडी, अनवडी, प्रभुचीवाडी, सातारारोड, खातगुण, बुध, निमसोड, म्हसवड, वडगाव, नांदगाव, किकली, पिलीव (सोलापुर) समर्थ बैठकीतील हजारो श्रीसदस्यांनी अभियानात सहभाग घेतला.