maharashtra

नाडे येथील एकाची ९ लाख ५० रुपयांची फसवणूक


ऊस तोडणीसाठी आठ जोड्या कामगार देतो, असे सांगून नाडे, ता. पाटण येथील एकाची ९ लाख ५० हजार रुपयांची सुरू केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : ऊस तोडणीसाठी आठ जोड्या कामगार देतो, असे सांगून नाडे, ता. पाटण येथील एकाची ९ लाख ५० हजार रुपयांची सुरू केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदाशिव राठोड, वय ४८ या गोणसत्ती, ता. विजापुर याने निवास सावळाराम नलवडे, र. नाडे, ता. पाटण यांना आठ जोड्या ऊस कामगार देतो असे सांगून दि.१७ ऑगस्ट २०२० ते दि. २३ सप्टेंबर २०२० या कालावधीमध्ये निवास नलावडे यांच्याकडून ९ लाख ५० हजार रुपये घेतले होते. मात्र अद्याप पर्यंत त्याने ऊसतोड कामगार न पुरवता फसवणूक केल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.