maharashtra

पळशी येथे परप्रांतीयांचा जिभ कापून खून

म्हसवड पोलिसांनी हल्लेखोराला केले एका तासातच जेरबंद

माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापार्‍याचा कुर्‍हाडीने निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली. मात्र, म्हसवड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत हल्लेखोरास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

दहिवडी : माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापार्‍याचा कुर्‍हाडीने निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली. मात्र, म्हसवड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत हल्लेखोरास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
बाळू गणपत जाधव (मूळ रा. रायगड जिल्हा, सध्या रा. पळशी, ता. माण) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मूळचे रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेली कातकरी समाजातील दोन ते तीन कुटुंबे व्यवसायानिमित्त पळशी येथे वास्तव्यास होती. त्यांच्यातील अंतर्गत वादाचे मारहाणीत रुपांतर होऊन कुशा चंदर जाधव नामक व्यक्तीचा कुर्‍हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवार दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. मयत व्यक्तीचा खुन करुन क्रुरपणे जीभ तोडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र या प्रकरणातील आरोपी पळशी येथील खंडोबा माळ परिसरात एका तासात म्हसवड पोलिसांनी जेरबंद केला. याबाबत मंगल कुशा जाधव यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिकचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.