maharashtra

विसावा नाका येथे घरफोडी; 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास


विसावा नाका येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : विसावा नाका येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची फिर्याद सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विसावा नाका येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून तब्बल 11 तोळे सोन्याचे ऐवज, रोख रक्कम असा 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि. 13 रोजी घडली असून याप्रकरणी डॉ.सुषमा विलास माने (वय 68, रा. विसावा नाका, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, संशयितांनी घरातून सोन्याची अंगठी, सोन्याची बिस्कीटे व रोख 1 लाख 25 हजार रुपये चोरले असल्याचे तक्रारीत म्ह्टले आहे.