maharashtra

सातारा तालुक्यातील तिघांना तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये मारहाण


Three persons from Satara taluka were beaten in three separate incidents
सातारा तालुक्यातील तिघांना तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सातारा : सातारा तालुक्यातील तिघांना तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी जान्या तात्या पवार, वय 25, रा. आगाशिवनगर, ता. कराड याला सातारारोड, ता. कोरेगाव येथे मारहाण झाल्याने त्यात तो जखमी झाला. त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुसर्‍या घटनेत शकुंतला अंकुश शिवदास, वय 55, रा. प्रतापसिंह नगर, सातारा या महिलेला मारहाण झाल्याने त्यात ती जखमी झाली.  तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिसर्‍या घटनेत कोमल महेश सपकाळ, वय 21, रा. वाढे फाटा, सातारा या महिलेला तिच्या पतीने दारू पिऊन मारहाण केल्याने त्यात ती जखमी झाली. तिच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.