maharashtra

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील धुमाळआळी येथे राहणाऱ्या संजय साहेबराव धुमाळ, वय ४५ याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा येथील धुमाळआळी येथे राहणाऱ्या संजय साहेबराव धुमाळ, वय ४५ याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ ते दि. ८ जानेवारी दरम्यान सातारा शहर परिसरात वास्तव्य करणारी एक अल्पवयीन मुलगी शाळेच्या प्रोजेक्टचे साहित्य आणण्यासाठी संजय धुमाळ यांच्या दुकानात गेली होती. त्या दरम्यान संजय धुमाळ यांनी विनयभंग केल्याची तक्रार संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. संजय धुमाळ याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.