येथील राधिका रोडवर आंबाजनी बंगला येथे रस्ता आडवला प्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : येथील राधिका रोडवर आंबाजनी बंगला येथे रस्ता आडवला प्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ मार्च ते दि. २८ मार्च दरम्यान अमित भोसले, रा. शुक्रवार पेठ, सातारा, कुंदा सोपान वांगडे, हिना कपिल नायक, रा. राधिका रोड, सातारा यांनी सातारा येथील आंबाजनी बंगला येथील बिल्डिंगच्या पहिला मजला व दुसरा मजला त्याच्यामध्ये असलेल्या जुन्या वर लोखंडी अँगल ला गेटचे कुलूप लावून घरात येण्यास अटकाव केल्याची तक्रार नामदेव खाशाबा वांगडे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.


