वाई येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वाई येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सातारा : रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वाई येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अभिनेत्री अश्विनी महांगडे जिने स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमध्ये राणू अक्काची दमदार भूमिका साकारली होती, तसेच सध्या घरोघरी सर्व महिला आवडीने पाहतात ती ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी पसरणी गावची सुकन्या अश्विनी महांगडे या प्रतिष्ठान च्या अध्यक्ष आहेत आणि निलेश बाबा जगदाळे कार्याध्यक्ष आणि प्रतिष्ठानचे अनेक मावळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम गेली चार वर्ष राबवित आहेत. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मेडिकल कॅम्प,महिलांसाठी विविध कार्यक्रम सातत्याने घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याची काम अश्विनीताई आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. त्यांच्या कार्यास शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते विजयाताई भोसले यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी वाई विभागाच्या डीवायएसपी शितल जानवे-खराडे यांचाही सत्कार पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.


