सातारा शहरसह तालुका पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारुन दोघांविरोधात कारवाई केली आहे.
सातारा : सातारा शहरसह तालुका पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारुन दोघांविरोधात कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर येथे महम्मद वजीर खान (वय 69, रा.रविवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द पोलिसांनी कारवाई करुन 3220 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. दुसरी कारवाई आरळे ता.सातारा येथे अर्जुन शिवलाल राठोड (वय 48, रा. सदरबझार, सातारा) याच्याकडून 680 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दिल्या आहेत.


