सातारा जिल्ह्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी सूरु असणाऱ्या दारू अड्डयावर पोलिसांनी छापे टाकुन १३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
सातारा : सातारा जिल्ह्यात सहा वेगवेगळ्या ठिकाणी सूरु असणाऱ्या दारू अड्डयावर पोलिसांनी छापे टाकुन १३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लाडेगाव, ता. खटाव येथे तेथीलच चंद्रकांत एकनाथ यादव याच्याकडून ९६०, पुसेसावळी, ता. खटाव येथे तेथीलच रविंद्र किसन पवार यांच्याकडून १ हजार ४२०, शेवाळवाडी फाटा, ता. कराड येथे तेथीलच अनिल परशुराम सूर्यवंशी याच्याकडून ६ हजार ७२०, अपशिंगे, ता. सातारा येथे माळ नावाच्या शिवारात गंजीच्या आडोशाला पांडुरंग श्रीरंग मोहिते रा. आंबेवाडी, ता. सातारा याच्याकडून ९९०, पानवन, ता. माण गावच्या हद्दीत घराच्या आडोशाला तेथीलच नाथा शामराव नरळे याच्याकडून १ हजार ४४०, मेढा चौक, ता.जावली येथे टॉवरच्या भिंतीच्या अडोषाला तेथीलच आनंदा धोंडीबा ढेबे यांच्याकडून ५ हजार ७६० रुपये किमतीची दारू हस्तगत करण्यात आली.


