maharashtra

हिरकणी रायडर शुभांगी पवार हिचा अपघाती मृत्यू


Accidental death of Hirkani rider Shubhangi Pawar
हिरकणी रायडर शुभांगी पवार (वय ३२) हिचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे ही दुर्घटना घडली. टँकर डोक्यावरून गेल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाली.

सातारा : हिरकणी रायडर शुभांगी पवार (वय ३२) हिचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला. अर्धापूर तालुक्यातील दाभड हद्दीत भोकरफाटा येथे ही दुर्घटना घडली. टँकर डोक्यावरून गेल्याने शुभांगी पवार जागीच ठार झाली.
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या दि.१० ऑक्टोबर रोजी बाहेर पडल्या. १ हजार ८६८ किमी प्रवासासाठी त्या मोटारसायकलने निघाल्या होत्या. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर येथे पोहचल्या. पुढे आई तुळजाभवानीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर पुढे माहूर गडाची रेणुकामाता दर्शनासाठी ते सर्वजण जात होते. त्यावेळी भोकर फाटा दाभड येथे शुभांगी यांच्या दुचाकीचा अपघात झाला. टँकरची जोरदार धडक बसल्याने शुभांगी जागीच ठार झाल्या. दरम्यान, या घटनेने साताऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे.