maharashtra

शिक्षक बँकेत सहकार परिवर्तन पॅनेलची सत्ता

१७ जागांवर समितीचा दणदणीत विजय -सिध्देश्वर पुस्तके यांच्या सभासद विकास पॅनेलचा धुव्वा, केवळ चार जागांवर समाधान

शिक्षक बँक निवडणुकीत सत्तांतर होत बलवंत पाटील यांच्या सहकार परिवर्तन पॅनेलने १७ जागावर दणदणीत विजय मिळवून पुस्तके गटाच्या सभासद विकास पॅनेलचा धुव्वा उडविला. त्यांना केवळ चार जागावर विजय मिळवता आला.

सातारा : शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या शिक्षक बँकेच्या मतमोजणीला सकाळी ८ वा. छ. शाहू क्रीडा संकुल येथे सुरुवात झाल्यानंतर पहिला निकाल परळी गटाचा हाती आला. तेव्हा समितीचे तानाजी कुंभार यांच्या विजयाने खाते खोलले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतमोजणी सुरु होती. शेवटचा निकाल महिला प्रवर्गाचा हाती आला, त्यामध्येही समितीच्या महिलांनी बाजी मारली. शिक्षक बँक निवडणुकीत सत्तांतर होत बलवंत पाटील यांच्या सहकार परिवर्तन पॅनेलने १७ जागावर दणदणीत विजय मिळवून पुस्तके गटाच्या सभासद विकास पॅनेलचा धुव्वा उडविला. त्यांना केवळ चार जागावर विजय मिळवता आला.
संपूर्ण सातारा जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिक्षक बँकेसाठी मतमोजणीला सकाळी ८ वाजता छत्रपती शाहु क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये समितीचे १७ उमेदवार विजयी झाल्यानंतर विजयी उमेवारांसह सहकार परिवर्तन पॅनेलने गुलालाची उधळण करत मतमोजणी केंद्र ते पोवईनाका अशी पायी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ांस गुलालाची उधळण करतच अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिक्षक बँकेत विजयी सभा पार पडली.
शिक्षक बँकेसाठी चुरशीने मतदान झाले होते. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. रविवारी सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी मतमोजणीला सुरुवात केली. निवडणुक हॉलमध्ये १२ टेबलवर ही मतमोजणी सुरु झाली. सकाळी ८ वाजता सहकार परिवर्तन पॅनेल, सहकार विकास पॅनेल, स्वाभिमानी शेतकरी बँक परिवर्तन पॅनेलचे उमेदवार, कार्यकर्ते आतमध्ये होते. पहिला निकाल सकाळी १0 वाजता हाती आला. त्यामध्ये परळी गटाचे समितीचे उमेदवार तानाजी कुंभार यांच्या विजयाची घोषणा होताच मतदान केंद्राबाहेर पहिला गुलाल समितीने उधळला. सुरुवातीपासून मतमोजणीमध्ये समिती पुढे होती. त्यामुळे बहुतांशी सर्वच सर्वसाधारण गटामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसत होते. परंतु पुस्तके गटाचे कराड-पाटणचे उमेदवार महेंद्र जानगुडे यांनी विजयी खाते खोलले. तेव्हा पुस्तके गटाला आशा वाटू लागली. परंतु पुन्हा समितीने विजयी घौडदौड सुरुच ठेवली. त्यात नागठाणे, परळी, महाबळेश्वर असे निकाल हाती आले. संघाला केवळ आरळे, जावली, मायणी आणि कराड या जागांवर विजय मिळवता आला.
या निवडणुकीत १७ जागा विजयी झाल्याचे जाहीर होताच सहकार परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर 'कोण आली रे कोण आली, कपबशी आली, बलवंत पाटील यांचा विजय असो, उदय शिंदे यांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. गुलालाच्या उधळणीत मतदान केंद्रापासून भव्य अशी पायीच मिरवणूक पोवई नाका ते शिक्षक बँक अशी काढण्यात आली. पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजाच्ंया पुतळयास गुलालामध्ये उमेदवारांसह पॅनेलचे समन्वयक किंगमेकर बलवंत पाटील यांनी अभिवादन केल्यानंतर शिक्षक बँकेत विजयी सभा पार पडली.

गिरवी -तरडगाव मतमोजणीवेळी आक्षेप
गिरवी-तरडगाव मतदार संघात सहकार विकास पॅनेलच्या उमेदवारास निवडणूक येण्याची खात्री असल्याने त्यांचे कार्यकर्ते मतमोजणीच्या टेबलकडेलाच होते. परिवर्तन पॅनेलचे राजेंद्र बोराटे यांनी केवळ ५ मतांनी पराभव केल्याचे समजताच त्यांनी पुन्हा मतमोजणी करण्याची विनंती केली. तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पुन्हा मतमोजणी करता येणार नाही. आकडेवारी तपासा अशी सुचना दिली. परंतु पुन्हा विनंती करताच मतमोजणी केली. त्यावेळी मतपत्रिकेमधील शिक्कावरुन दोन मतांवर आक्षेप घेण्यात आला.

सर्वात कमी मतांनी तिघे विजयी
जावली मतदार संघातून शामराव जनुघरे यांना केवळ ४ मतांनी विजय शिर्के यांनी हरवले. तसेच रहिमतपूर मतदार संघातून गायकवाड यांना पवारांनी ४ मतांनी हरवले. गिरवी मतादार संघातही राजेंद्र बोराटे हे ५ मतांनी विजयी झाले.

.....................................
शिक्षक बँक निवडणुक गट, नाव, मतदान, चिन्ह पुढीलप्रमाणे :

कराड-पाटण गट
महेंद्र जानगुडे - ६९६ पतंग (विजयी)

नितीन नलवडे - ४९ शिट्टी
संजय नांगरे - ३८0 कपबशी

.................................................
नागठाणे गट

विशाल कणसे - ३९१ कपबशी (विजयी)
तुषार घाडगे - २३३ कपबशी

राजेश शिंगाडे - १४ विमान
........................................................

आरळे गट
गणेश दुबळे - २३ विमान

मनोहर माने -२६२ कपबशी (विजयी)
नितीन राजे - २९३ पतंग

............................................
परळी गट

विश्वास कवडे - ६५ पतंग
तानाजी कुंभार - २१३ कपबशी (विजयी)

ज्योतिराम जाधव - ३१ विमान
..............................

जावली गट
शाामराव जुनघरे- ३२२ कपबशी

विजय शिर्के - ३२६ पतंग (विजयी)
..........................................

महाबळेश्वर गट
सुशांत मोतलिंग - ४८ विमान

संजय संकपाळ - २१६ कपबशी (विजयी)
......................................

वाई गट
नितीन फरांदे - ४१३ कपबशी (विजयी)

राहुल हावरे - ३४१ पतंग
.................................

खंडाळा गट
विजय ढमाळ - ३0७ कपबशी (विजयी)

दशरथ ननावरे -१९८ पतंग
.............................................

फलटण गट
राजेश बोराटे - १५५ विमान

विजय भोसले - ३0 छत्री
लक्ष्मण शिंदे - २१0 पतंग

शशिकांत सोनवलकर - २७२ कपबशी (विजयी)
............................................

गिरवी-तरडगाव गट
नितीन करे - ३ आंबा

सचिन खराडे - २९४ पतंग
राजेंद्र बोराटे - २९९ कपबशी (विजयी

........................................
कोरेगाव गट

अरुण घोरपडे - २0२ पतंग
नितिन शिर्के - ३३३ कपबशी (विजयी)

......................................
रहिमतपूर गट

पृथ्वीराज गायकवाड - २५0 पतंग
सुरेश पवार - २५४ कपबशी (विजयी)

......................................
खटाव गट

दत्तात्रय गोरे - १७४ पतंग
नवनाथ जाधव - ३१२ कपबशी (विजयी)

................................................
मायणी गट

शहाजी खाडे - २३६ पतंग (विजयी)
आबासाहेब जाधव - १९५ कपबशी

लता बागल - १२६ विमान
.......................................

दहिवडी गट
महेंद्र अवघडे - १९७ पतंग

संजीवन जगदाळे - ३0९ कपबशी (विजयी)
आबासाहेब नाळे - १२ विमान

................................
म्हसवड गट

राजाराम तोरणे - २0९ पतंग
विजय बनसोडे - २११ कपबशी (विजयी)

..............................
महिला राखीव

वैशाली जगताप - २८ मोटारगाडी
पुष्पलता बोबडे - ४७५१ कपबशी

भारती मदने - ५२0 विमान
मनिषा महाडिक - ४३८ विमान

निशा मुळीक - ४४७४ कपबशी (विजयी)
रेखा मोहिते - ३६४0 पतंग

मनिषा रसाळ - ३४४३ पतंग
.....................................................

इतर मागास प्रवर्ग
राहुल नेवसे - ४५१ विमान

किरण यादव - ५१४५ कपबशी (विजयी)
संतोष शिंदे - ३५१३ पतंग

.............................................
विमुक्त जाती भटक्या जमाती

नितीन करे - २७ नारळ
नितीन काळे - ४८४१ कपबशी (विजयी)

विशाल गिरी - ३७0५ पतंग
विजय मदने - ५३३ विमान

........................................
अनुसुचित जाती जमाती

गौतम कोकाटे - ३५ रोडरोलर
ज्ञानबा ढापरे - ४८२0 कपबशी (विजयी)

गणेश दुबळे - ४९९ विमान
किशोर पवार - ३७४४ पतंग