सातारा एसटी स्टँड परिसरातील 7 स्टार इमारतीनजिक बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 35 वर्षीय युवकाचा जिल्हा रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. यासंदर्भात सिविल हॉस्पिटल चे डॉक्टर एस आर फाळके यांनी सातारा शहर पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दिली आहे.
सातारा : सातारा एसटी स्टँड परिसरातील 7 स्टार इमारतीनजिक बेशुद्धावस्थेत आढळलेल्या 35 वर्षीय युवकाचा जिल्हा रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला. यासंदर्भात सिविल हॉस्पिटल चे डॉक्टर एस आर फाळके यांनी सातारा शहर पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दिली आहे.
सीआरपीसी कायदा 174 प्रमाणे या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या इसमाचा नक्की कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे समजून येत नसल्याचे उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करत आहेत.


