येथील जुना मोटर स्टँड परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील जुना मोटर स्टँड परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० एप्रिल रोजी सात ते अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात पेट्रोल पंपासमोर बल्लाळ वेल्डिंग वर्क्स समोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ बी.एस. ११२० चोरून नेल्याची तक्रार मनीष रमेश महाडिक रा. सोनगाव, ता. सातारा यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.


