येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या सेव्हन स्टार सिनेमा हॉलच्या पार्किंगमधुन अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील बसस्थानक परिसरात असणाऱ्या सेव्हन स्टार सिनेमा हॉलच्या पार्किंगमधुन अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २१ डिसेंबर रोजी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान सातारा बस स्थानक परिसरात असणाऱ्या सेव्हन स्टार सिनेमा हॉलच्या पार्किंगमधुन हिरो होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम. एच .११ बीसी २८५३ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अक्षय सदाशिव निकम, रा. अपशिंगे, ता. सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


