भुईंज येथून राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : भुईंज येथून राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 25 ऑगस्ट रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कविता वसंत पवार वय 22, राहणार समता नगर, भुईंज, तालुका वाई ही धुण्या भांड्याचे नवीन काम पाहण्यास जाते, असे सांगून राहत्या घरातून निघून गेली असल्याची फिर्याद काळुबाई शिवाजी जाधव वय 55 राहणार समता नगर गोविंद यांनी भुईंज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.


