maharashtra

राहत्या घरातून एक जण बेपत्ता


राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची खबर सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची खबर सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून जयवंत जनार्दन शिंदे वय 52, रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा हे रेशनिंग आणायला जातो, असे सांगून राहत्या घरातून निघून गेले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.