एकास मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस लाईन, गोडोली रस्त्यावर विजय सखाराम यादव (रा.गोडोली) याने मारहाण केली असल्याची तक्रार अतिश आनंदा कांबळे (वय 38, रा. विलासपूर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 15 नोव्हेंबर रोजी घडली आहे. फरशी डोक्यात मारुन जखमी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


