पाण्याच्या मोटरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : पाण्याच्या मोटरची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 ते 11 मार्च दरम्यान तासगाव, तालुका सातारा गावच्या हद्दीत गट नंबर 84 मधील पठार नावाच्या शिवारातील कॅनॉलवर असणारी भाऊसो श्रीरंग जाधव रा. तासगाव तालुका सातारा यांची 9 हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक राऊत करीत आहेत.


