maharashtra

क्षेत्रमाहुली येथे मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हे


Crimes against six persons for assault at Kshetramahuli
क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे गर्दी करून मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सातारा : क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथे गर्दी करून मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सायली ऋतुराज गायकवाड, रा. क्षेत्रमाहुली यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि.२६ रोजी ९.३०  वाजण्याच्या सुमारास  क्षेत्रमाहुली येथे त्यांचे चुलत सासरे राजेंद्र गायकवाड व पती ऋतुराज गायकवाड ‌हे घराच्या बाहेरील बाजूस रस्त्याच्या कडेला तोडलेले जळण व्यवस्थित ठेवत असताना चुलत सासरे अविनाश हणमंत गायकवाड, हणमंत गायकवाड, जयश्री गायकवाड, सेजल गायकवाड, सिद्धी गायकवाड, सई गायकवाड यांनी गर्दी करून मारहाण केली.