maharashtra

लोखंडी गेट चोरून नेल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा


येथील गुरु शिल्प टॉवर्स अपार्टमेंटच्या पाठीमागून पाच हजार रुपये किमतीचे लोखंडी गेट चोरून नेल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील गुरु शिल्प टॉवर्स अपार्टमेंटच्या पाठीमागून पाच हजार रुपये किमतीचे लोखंडी गेट चोरून नेल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १४ ऑक्टोंबर रोजी ७.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील गुरु शिल्प टॉवर्स अपार्टमेंटच्या पाठीमागून दत्ता बापू गोपनार, रा. वनवासवाडी, ता. सातारा, अमोल बाबासो शिंदे, रा. गुरुदत्त कॉलनी, संगमनगर, सातारा या दोन जणांनी पाच हजार रुपये किमतीचे लोखंडी गेट चोरून नेल्याची तक्रार रिजवान मोहम्मद शेख, रा. करंजी नाका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली. वरील दोघांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.