maharashtra

जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता


जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काटेवाडी तर तालुका पाटण येथून दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत दत्तू जरग वय 54 रा. काटेवाडी, तारळे, तालुका पाटण हे मार्केटला जाऊन येतो, असे सांगून निघून गेले. ते अद्याप पर्यंत आले नसल्याची फिर्याद छाया चंद्रकांत जरग वय 45 यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 2 सप्टेंबर रोजी दहा वाजण्याच्या सुमारास रफिक अब्बास शेख व 44 राहणार सुरवडी तालुका फलटण हे बेपत्ता झाल्याची फिर्याद शबाना रफिक शेख वय 35 यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
तिसऱ्या घटनेत दिनांक 10 सप्टेंबर रोजी राहत्या घरातून रोहन तुकाराम भोसले वय 35, रा. गोकर्ण नगर, खेड, तालुका सातारा हे बेपत्ता झाल्याची फिर्याद तुकाराम भिकू भोसले यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
चौथ्या घटनेत दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान बनवडी कॉलनी, कराड, तालुका कराड येथील राहत्या घरातून जमेला राजुद्दीन मालेकर वय 27 ही विवाहिता मुलगा अली राजुद्दीन मागलेकर वय 7 याच्यासह बेपत्ता झाल्याची फिर्याद राजुद्दीन मुसा मागलेकर वय 43 यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.