विवेक देशमुख घाटांचा किंग, गायत्री कुचेकर घाटांची क्वीन
सातारा सायकलिंग रायडर्स क्लबच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
दत्तजयंतीच्या निमित्ताने शनिवारी सातारा सायकलिंग रायडर्स क्लब आयोजित 'सायकल हिल क्लाइंब चॅलेंज' स्पर्धा यवतेश्वर घाटात मोठया उत्साहात पार पडली. स्पर्धेत घाटांचा किंग हा किताब विवेक देशमुख याने, तर घाटांची क्वीन हा किताब गायत्री कुचेकर हिने पटकावला. यामध्ये ६ वर्षाच्या मुलापासून ते ६६ वर्षांच्या रायडर्सनी सहभाग नोंदवला होता.
सातारा : दत्तजयंतीच्या निमित्ताने शनिवारी सातारा सायकलिंग रायडर्स क्लब आयोजित 'सायकल हिल क्लाइंब चॅलेंज' स्पर्धा यवतेश्वर घाटात मोठया उत्साहात पार पडली. स्पर्धेत घाटांचा किंग हा किताब विवेक देशमुख याने, तर घाटांची क्वीन हा किताब गायत्री कुचेकर हिने पटकावला. यामध्ये ६ वर्षाच्या मुलापासून ते ६६ वर्षांच्या रायडर्सनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. सातारा, फलटण, उंब्रज, मेढा, कोरेगाव, वाई, पाचवड,कराड येथील सायकलपट्टूंनी सहभाग घेतला होता.
चार गटात झालेल्या स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात अनुक्रमे प्रथम क्रमांक दीप नेटके, द्वितीय रिहान शेख, तृतीय पार्थ जाधव यांनी बाजी मारली. १६- ३५ या पुरुष गटात अनुक्रमे प्रथम क्रमाक विवेक देशमुख, द्वितीय सूर्या गेंगजे, तृतीय अश्विन मर्ढेकर यांनी पटकावला. ३५ वर्षावरील पुरुष गटात अनुक्रमे प्रथम क्रमांक कृष्णा सोनमळे, द्वितीय दत्ता नवघणे, तृतीय सचिन नवघणे यांनी यश मिळवले.
तर महिला गटात अनुक्रमे प्रथम क्रमांक गायत्री कुचेकर, द्वितीय अद्विता उपाध्याय, तृतीय केतकी कदम यांनी पटकावला. घाटांचा किंग हा किताब विवेक देशमुख याने तर घाटांची क्वीन हा किताब गायत्री कुचेकर हिने पटकावला. सर्वात लहान रायडर मजहर शेख व सर्वात वरिष्ठ मधुआण्णा खुळे-देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
स्पर्धेसाठी तेजस पेट्रोलियम, राजपुरोहित स्वीट्स, गजानन सुझुकी, जयहिंद मोटर्स, गीता कंस्ट्रक्शन, बालाजी मोबाइल्स, समर्थ लैब, व्ही.एस इंडस्ट्रीज व टॉप गिअर ट्रांसमिशन यांचे प्रायोजकत्व होते.
प्रायोजकांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल व सर्टिफिकेटचा वितरण समारंभ हॉटेल निवांत येथे पार पडला. सातारा रायडर्स क्लबने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पर्यावरण वाचवा व प्रदूषणमुक्त जीवन या उपक्रमासाठी सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


