मोहोडेकरवाडी ता. वाई येथे एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा : मोहोडेकरवाडी ता. वाई येथे एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ रोजी ही घटना घडली आहे. मोहोडेकरवाडीतील संतोष गणपत बांदल वय ४७ यांनी खिळ्याचे वावर नावाच्या शिवारात उंबराच्या झाडाच्या फांदीला निळ्या रंगाच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत बाळक ृष्ण बबन बांदल वय ६२ यांनी खबर दिली असून पो लिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार तोडरमल करत आहेत.


