जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांना मारहाण झाल्याची घटना घडली.
सातारा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघांना मारहाण झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोष भिकाजी सूर्यवंशी, रा. प्रतापगंज पेठ, सातारा यांना दि. १६ मार्च रोजी मारहाण झाली होती. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत सोमनाथ हणमंत जाधव, वय ३२, रा. दुघी ता कोरेगाव यांना मारहाण झाली. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


