maharashtra

पोलीस अधीक्षकांनी केले वाठार स्टेशन परिसरातील 4 जण तडीपार


Superintendent of Police deported 4 persons from Wathar station area
समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरोधात पोलीस अधीक्षक नेहमीच दंडुका उगारुन उभे आहेत. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी वाठार स्टेशन परिसरातील 4 जणांना तडीपारीचा आदेश जारी केला आहे.

सातारा : समाजविघातक कृत्य करणार्‍यांविरोधात पोलीस अधीक्षक नेहमीच दंडुका उगारुन उभे आहेत. याच अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी वाठार स्टेशन परिसरातील 4 जणांना तडीपारीचा आदेश जारी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,  वाठार, रहिमतपूर, औंध पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, दरोड्याची तयारी, घरफोडी, फळविक्रीचे गाडे फळांसह जाळणे असे गुन्हे करणार्‍या टोळीचा प्रमुख प्रदिप प्रकाश माने (वय 26), अक्षय बाजोराव दोरके (वय 27 दोघेही रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा), विजय बाळु जाधव (वय 19 रा. भाडळे, ता.कोरेगाव, जि.सातारा), इरशाद हारुण मुल्ला (वय 36, रा. रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) या टोळीतील 4 जणांना हद्दपार करण्याबाबत वाठार पोलोस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल धोंगडे यांनी प्रस्ताव सादर केला होता.
या टोळोतील 4 जणांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये एका वर्षा करीता पुर्ण सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.
जिल्हा हद्दीत हिसक घटना घडुन भीती व दहशतीचे वातावरण निमाण होवू नये म्हणुन वरील प्रमाणे कारवाई करण्यात आली. अजय कुमार बन्सल यांनी जिल्ह्याचा कार्यभार स्विकारल्यापासुन 25 प्रस्तावातील बेकायदेशीर कारवाया करणार्‍या 92 जणांना हद्दपारीचे आदेश दिलेले आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उर्पानरीक्षक मधुकर गुरव, पो. ना. प्रमोद सावंत, पो.कॉं. केतन शिंदे, म.पो.कॉं.अनुराधा सणस, वाठार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन जगताप यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईबाबत सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.