maharashtra

राष्ट्रवादीच्या प्रभावाची रिपाइंच्या नेत्यांना भीती

राष्ट्रवादी प्रदेश महासचिव काकासाहेब खंबाळकर यांचा पत्रकार परिषदेत टोला

RPI's leaders fear the NCP's influence
महाराष्ट्रामध्ये यांच्या विचारांचा वारसा सांगणारा एकही रिपब्लिकन पक्ष उरलेला नाही. प्रत्येक गटाच्या नेत्याने पक्षाच्या नावाखाली स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न चालविला आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या उत्कर्षाची वाटचाल सुरू आहे. त्याचा प्रसार सातारा जिल्ह्यात केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादीचे काकासाहेब खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : महाराष्ट्रामध्ये यांच्या विचारांचा वारसा सांगणारा एकही रिपब्लिकन पक्ष उरलेला नाही. प्रत्येक गटाच्या नेत्याने पक्षाच्या नावाखाली स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न चालविला आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजाच्या उत्कर्षाची वाटचाल सुरू आहे. त्याचा प्रसार सातारा जिल्ह्यात केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादीचे काकासाहेब खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी दक्षिण मध्य मुंबईचे विष्णू गायकवाड व मनीषा कापडणे उपस्थित होते.
खंबाळकर पुढे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा मी नियमित प्रसार केला. बरीच वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम केल्यानंतरही बहुजनांना न्याय मिळेल असे न वाटल्याने मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो पक्ष स्थापन केला होता तो पक्ष बाबासाहेबांच्या विचारांचा राहिलेला नाही. प्रत्येक गटाच्या नेत्याने पक्षाच्या नावाखाली आपलाच प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न ठेवला आहे. त्यामुळे बहुजनांचा उत्कर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली होईल असे वाटत नाही. शरद पवार यांच्या थेट कृतीतून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगितला जातो. तीच ध्येयधोरणे पक्ष मार्फत राबविली जात आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रभावातून राष्ट्रवादी पक्षाच्या प्रभावातून रिपाई नेत्यांना आता भीती वाटू लागली आहे. जिल्ह्यातील रिपाई गटाचे अनेक महत्त्वपूर्ण मोहरे आमच्या संपर्कात असल्याचा दावा खंबाळकर यांनी केला. आतापर्यंत राष्ट्रवादीत 50 कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढेही बहुजन उत्कर्षाचे काम असेच नेटाने पुढे सुरू ठेवणार आहे. पुढील महिन्यात साताऱ्यात प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शना अंतर्गत सातारा जिल्हयात कार्यकर्ता मेळावा घेणार आहे, असे खंबाळकर यांनी सांगितले.