नकली नंबर प्लेट तयार करून वापरल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : नकली नंबर प्लेट तयार करून वापरल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 सप्टेंबर 2022 ते 5 फेब्रुवारी 2023 दरम्यान प्रदीप शंकर वंजारी रा. लिंब, ता. सातारा यांच्या मालकीच्या महिंद्रा कंपनीच्या मराझो मॉडेलच्या गाडी सारखी दिसणारी गाडी घेऊन वंजारी यांच्या गाडीचा क्रमांक एमएच 11 सीक्यू 9847 सारखीच बनावट नंबर प्लेट तयार करून ती नंबर प्लेट स्वतःच्या मालकीची खरी आहे, म्हणून वापरून फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजी विलास सावंत (पाटील) रा. लिंब, ता. सातारा यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार बागवान करीत आहेत.


