maharashtra

महिलेचा खून केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्यापूर्वी विकास हिरामण सकट मूळ राहणार कलेढोण, तालुका खटाव. हल्ली राहणार फुलेनगर, तालुका वाई याने वाढे, तालुका सातारा गावच्या हद्दीत सातारा-लोणंद रस्त्याच्या पश्चिमेस असलेल्या माजी आमदार कांताताई नलवडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागे आवारात मंगल शिवाजी शिंदे वय 50, राहणार संगम माहुली, तालुका सातारा यांच्याकडील सोन्याचे डोरले व बोरमाळ असे दागिने काढून घेऊन सकट याने मंगल शिंदे यांच्या डोक्यात खोऱ्याने मारून त्यांचा खून करून पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने त्यांचे प्रेत खड्ड्यात पुरून टाकले. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सकट याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके करीत आहेत.