महिलेवर वेळोवेळी अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो काढून ते व्हॉटसअपवर व्हायरल केल्याप्रकरणी दोघांविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ऑगस्ट 2017 पासून वेळोवेळी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा : महिलेवर वेळोवेळी अत्याचार करुन तिचे अश्लील फोटो काढून ते व्हॉटसअपवर व्हायरल केल्याप्रकरणी दोघांविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ऑगस्ट 2017 पासून वेळोवेळी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
संतोष सदाशिव पवार (वय 40, रा. तामजाईनगर, सातारा) याच्यासह एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित संतोष पवार याने महिलेचा सुरुवातीला पाठलग केला. त्यानंतर भिती दाखवून वेळोवेळी ठिकठिकाणच्या लॉजवर नेवून महिलेवर बलात्कार केला. यानंतर वेळोवेळी विश्वास संपादन करुन 6 लाख रुपये उसने पैसे घेतले. महिलेने पैसे परत मागितल्यानंतर संशयिताने महिलेला तिचे अश्लील फोटो दाखवून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर महिलेने पोलीस ठाण्यात जावून तक्रार दिल्यानंतर तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला.


