maharashtra

दारूच्या नशेत मुलाची माता-पित्यास मारहाण


दारूच्या नशेत मुलाने माता-पित्यास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : दारूच्या नशेत मुलाने माता-पित्यास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मुलावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 28 जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास सैदापूर, ता. सातारा येथील बापू गणपत कदम वय 62 आणि त्यांची पत्नी कुसुम यांना त्यांचा मुलगा प्रकाश बापू कदम याने घरास बाहेरून कडी का घातली, असे विचारल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने व पट्ट्याने मारहाण करून शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश कदम याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार कुमठे करीत आहेत.