maharashtra

दोघांना मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा


पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मनोहर बापू सावंत रा. सोनगाव तर्फ, सातारा यांनी घरासमोरून जेसीबी घेऊन जाऊ नका, असे म्हटल्याच्या कारणावरून त्यांना आणि त्यांच्या पत्नीस तेथीलच सुरेश पवार (पूर्ण नाव माहित नाही), रमेश लक्ष्मण पवार, अक्षय रमेश पवार, गणेश सुरेश पवार, प्रमोद रमेश पवार, शैला रमेश पवार या सहा जणांनी हाताने धक्काबुक्की करून शिवीगाळ केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक निकम करीत आहेत.