येरवळे, ता. कराड येथे लोखंडी पाईपने झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरु नका, असे म्हणून एकाने संबंधितास मारहाण केली. रविवारी 6 रोजी दुपारी ३.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
कराड : येरवळे, ता. कराड येथे लोखंडी पाईपने झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरु नका, असे म्हणून एकाने संबंधितास मारहाण केली. रविवारी 6 रोजी दुपारी ३.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एकजण जखमी झाला असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
भगवान बाळासो लोकरे असे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तर सागर शामराव लोकरे असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सागर लोकरे हे रविवारी दुपारी घरी असताना भगवान लोकरे याने मोबाईलवरुन शरद लोकरे याला फोन केला. यावेळी त्याने निवडणुकीसाठी अर्ज भरु नका, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर सागर लोकरे व त्यांचा पुतण्या विश्वजीत लोकरे घरी असताना भगवान लोकरे हा दारु पिऊन तेथे आला. त्याने आशितोष लोकरे याचा अर्ज मागे घ्यायला सांगा; नाहीतर तुझ्या भावाला मारुन टाकेन, अशी धमकी दिली. तसेच सयाजी यादव यांच्या नादी लागू नका, असे म्हणून सागर लोकरे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तेथे पडलेली लोखंडी पाईप सागर लोकरे यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी सागर लोकरे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.


