maharashtra

बोंडारवाडी धरणाचा प्रश्न एक वर्षाच्या आत सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार : डॉ. भारत पाटणकर


Bondarwadi dam issue to be resolved within a year: Dr. Bharat Patankar
जावली तालुक्यातील केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्वाचा प्रश्न आहे. जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने एक वर्षाच्या आत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

केळघर : जावली तालुक्यातील केळघर येथे बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्वाचा प्रश्न आहे. जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे, मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पध्दतीने एक वर्षाच्या आत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल, अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रणेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात २५ नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सोबत जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची श्रमिक मुक्ती दल व  कृती समिती यांची बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी जलसंपदा विभागास धरणाचा प्रस्ताव सादर करायला सांगितले होते. २०डिसेंबर पर्यंत प्रस्तावाची वाट पाहणार आहे. अहवाल वेळेत न झाल्यास श्रमिक मुक्ती दल तीव्र लढा उभारेल. हा प्रकल्प उभारताना प्रकल्पात जे बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन व इतर आवश्यक बाबीसाठी पाठपुरावा करू. हे धरण रखडल्याने ५४ गावातील युवक रोजगारासाठी मुंबई व पुण्याचा रस्ता पकडत आहेत. हा प्रकल्प झाल्यास स्थलांतर थांबेल. या प्रकल्पामुळे शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायांची वाढ होईल. त्यामुळे रोजगार उपलब्ध होतील. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प होणार आहे. कृष्णा खोऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. कण्हेर धरणाच्या राखीव ६ टक्के पाणी साठ्यातून हा प्रकल्प मार्गी लागेल. हा प्रकल्प गुरुत्वाकर्षण पद्धतीने होत असल्याने याचा फायदा शासनाबरोबरच जनतेला होणार आहे. ५४ गावांतील १० हजार कुटुंबांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. अतिवृष्टी होऊन देखील येथे पाणी टंचाई जाणवते त्यामुळे आता ५४ गावातील नागरिक एकजूट झाले आहेत. नागरिकांच्या एकीतून हा प्रकल्प एक वर्षाच्या आत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत कोयना व चांदोली धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंबंधी श्रमिक मुक्ती दलाने यशस्वी पाठपुरावा केला आहे. बोंडारवाडी धरण पूर्ण होण्यासाठी लोकसहभागातून लढा उभारला असून हा प्रकल्प निश्चित मार्गी लागेल, असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.