maharashtra

सासरच्या मंडळीकडून जावयाला मारहाण

पत्नीसह चौघांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात पतीने दिली तक्रार

सदरबझार येथे राहत असलेल्या जावयाला त्याच्या वडिलांच्या घरी जाऊन सासु-सासरे, मेव्हणा व पत्नीने मारहाण केल्याची तक्रार पतीने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अमितकुमार राजेंद्र फरांदे(वय 30) असे त्याचे नाव आहे.  

सातारा : सदरबझार येथे राहत असलेल्या जावयाला त्याच्या वडिलांच्या घरी जाऊन सासु-सासरे, मेव्हणा व पत्नीने मारहाण केल्याची तक्रार पतीने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अमितकुमार राजेंद्र फरांदे(वय 30) असे त्याचे नाव आहे.  
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमितकुमार फरांदे याला सोमवार दि. 12 रोजी सासरच्या मंडळीनी त्यांच्या सदरबझार येथील वडिलांच्या घरी बोलवून घेतले. तेथे त्यांच्यात शब्दिक वाद सुरू झाला. तोच सासरे पांडूरंग सपकाळ, मेव्हणा श्रेयस सपकाळ, सासु संगिता सपकाळ (सर्व रा. चिंचणेर वंदन, सातारा) व पत्नी सायली फरांदे यांनी हाताने मारहाण करायला सूरूवात केली. शिवीगाळ व दमदाटी करून मेव्हणा श्रेयस याने कपाळाला चावा घेऊन दुखापत केली. यामुळे या चौघांविरूद्ध विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात अमितकुमार याने तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक ठोंबरे करत आहेत.