येथील हॉटेल महेंद्रा शेजारील ग्लोबल वर्कशॉप गॅरेजमध्ये मारहाण व धमकी देण्याचा प्रकार दि. 10 रोजी सकाळी 11.30 वाजता घडला.
सातारा : येथील हॉटेल महेंद्रा शेजारील ग्लोबल वर्कशॉप गॅरेजमध्ये मारहाण व धमकी देण्याचा प्रकार दि. 10 रोजी सकाळी 11.30 वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शोयेब मोहम्मद शेख यांचे गॅरेज असून, त्यामध्ये सदाशिव बुधवले (रा. विसापूर, ता. कोरेगाव) यांनी चारचाकी दुरुस्तीला दिली होती. गाडीचे पार्टमिळत नसल्याने गाडीचे काम होणार नाही, असे शेख यांनी सांगितले. त्यावर बुधवले यांनी फिर्यादीला मारहाण केली.


