maharashtra

जिल्ह्यातील आले उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा : राजू शेळके


जिल्ह्यातील सर्व आले उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली लूट तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी सातारा, कोरेगाव, खटाव येथील शेती उत्पन्न बाजार समितीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

सातारा : जिल्ह्यातील सर्व आले उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली लूट तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी सातारा, कोरेगाव, खटाव येथील शेती उत्पन्न बाजार समितीकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, आपल्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील आले उत्पादक शेतकरी यांचे आले व्यापारी प्रचंड प्रमाणात मनमानी पद्धतीने लूट करत आहेत. आले खरेदी व्यवहारात नवे जुने असा फरक करून फसवाफसवी करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये आपल्या संस्थेचा परवानाधारक व काही बिगर परवानाधारक व्यापारी आपल्या कार्यक्षेत्रात अशा पद्धतीने व्यवसाय करून शेतकऱ्यांना वेटीस धरत बेकादेशीर व्यापार करत आहे. आपल्या माध्यमातून अशा सर्व व्यापाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. आज पर्यंत आले पिकाची खरेदी परंपरा सुरू आहे त्याप्रमाणे सरसकट खरेदी झाली पाहिजे. जे व्यापारी अशा प्रकारे आले खरेदी करण्यास नकार देतील किंवा बेकायदेशीर व्यापार करून शेतकऱ्यांना फसवतील अशा व्यापारांचा परवाना रद्द करण्यात यावा. आपल्याकडे जे परवानाधारक नोंदणी धारक व्यापारी आहेत त्यांना याबाबत तातडीने नोटीस बजावावी. जे नोंदणी धारक व्यापार करत नसतील किंवा बिगर पेरावांना व्यापार करत असतील अशा सर्व व्यापाऱ्यांवर, संस्थानवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. व्यापारी शेतकऱ्यांची लूट करताना अथवा बाजारभावापेक्षा कमी दर देतील अशा व्यापाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना धडा शिकवेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारणी सदस्य अर्जुन साळुंखे, सातारा तालुकाध्यक्ष रमेश पिसाळ, सातारा उपाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा संघटक मनोहर येवले, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख हेमंत खरात, हेमंत मोरे,s राजू घाडगे उमेश घाडगे उपस्थित होते.