maharashtra

चंद्रकांत  देवरुखकर यांचे कार्य सुवर्णकार समाजाला प्रेरक

सागर सागवेकर : पुरस्काराबद्दल देवरुखकर यांचा सत्कार  

Chandrakant Devrukhkar's work inspires the goldsmith community
चंद्रकांत देवरुखकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडले, समस्यांना वाचा फोडली तर अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीमत्वाचा प्रतापसिंह महाराज आदर्श पत्रकार पुरस्काराने झालेला गौरव सुवर्णकार समाजासाठी प्रेरक असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा पांचाळ सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सागर सागवेकर यांनी केले.  

सातारा : गेल्या 27 वर्षांपासून वृत्तपत्रात कार्यरत असलेल्या चंद्रकांत देवरुखकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न मांडले, समस्यांना वाचा फोडली तर अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या व्यक्तीमत्वाचा प्रतापसिंह महाराज आदर्श पत्रकार पुरस्काराने झालेला गौरव सुवर्णकार समाजासाठी प्रेरक असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा पांचाळ सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सागर सागवेकर यांनी केले.  
पत्रकार चंद्रकांत देवरुखकर यांना सातारा पालिकेतर्फे प्रतापसिंह महाराजा आदर्श पत्रकार पुरस्कार देवून गौरवण्यात आल्याबद्दल सुवर्णकार समाजातर्फे त्यांचा 'तरुण भारत' च्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी सागवेकर बोलत होते. यावेळी सुवर्ण समाज संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार सचिन पंडीत, विलास पंडीत, सचिव किशोर पोतदार, कायदेशीर सल्लागार ऍड. मुकेश निवंडीकर तसेच उपसंपादक सुधीर जाधव, अमर सोडमिसे, जगन्नाथ शिर्के उपस्थित होते.  
देवरुखकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्हाभरात समाजातील सर्व घटकांशी स्नेह जपला असून अडअडचणीच्या प्रसंगी निरपेक्ष भावनेने धावून जाण्याच्या त्यांच्या वृत्तीने ते समाजप्रिय व्यक्तीमत्व असल्याची भावना व्यक्त करत सचिन पंडीत समाजातर्फे अभिनंदन केले.  
यावेळी सागर सागवेकर यांच्या हस्ते बुके व सातारी कंदी पेढे देवून देवरुखकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. किशोर पोतदार यांनी आभार मानले.