वाई तालुक्यातील वेळे येथे भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांना भुईंज पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे. काही तासांतच ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : वाई तालुक्यातील वेळे येथे भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यांना भुईंज पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे. काही तासांतच ही चोरी उघडकीस आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आकाश हेमराज परदेशी (रा. येरवडा, पुणे), मनोज एकनाथ मोरे (रा. भोलावडे, ता. भोर) व विवेक नामदेव कानडे (रा. वडगाव, ता. भोर) अशी ताब्यात घेतल्यामची नावे आहेत.
वेळे येथे 7 डिसेंबरला दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान अभिषेक पवार यांच्या बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांने कपाटातील 2 लाख 2 हजार 826 रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते. कपाटाचा पत्रा लागल्याने घटनास्थळी चोरट्य़ाच्या रक्ताचे डाग पोलिसांना तपासाच्या दिशेने घेऊन गेले. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या सहकाऱ्यांनी तपासाच्या सूचना केल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने संशयितापर्यंत पोलिसांना पोहोचण्यात यश आले व चोरीच्या दागिन्यांसहित रोख रक्कम असा मुद्देमाल व चोरीसाठी वापरलेल्या दुचाकीसह संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवत बोलते केले. या टोळीवर पुणे जिल्ह्यात घरफोडी, जिवे मारण्याची धमकी अशाप्रकारचे वेगवेगळे 34 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशीष कांबळे यांनी दिली.
सहायक निरीक्षक आशीष कांबळे, निवास मोरे, सहायक फौजदार विकास गंगावणे, हवालदार शंकरराव घाडगे, आनंद भोसले, शिवाजी तोरडमल, दत्तात्रय धायगुडे, चंद्रकांत मुंगसे, अविनाश नेहरकर, सुशांत धुमाळ यांनी ही कारवाई केली. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी भुईंज पोलिसांचे अभिनंदन केले आहे.


