maharashtra

जिल्ह्यातून तीन दुचाकी चोरीस


Three two-wheelers stolen from the district
जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने तीन दुचाकी चोरुन नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

सातारा : जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने तीन दुचाकी चोरुन नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जून रोजी 3 वा. सुमारास सस्तेवाडी गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एमएच 11 बीजी 9949 ही चोरुन नेल्याची तक्रार निवास विलास अहिवळे (वय 38, रा. मंगळवार पेठ, फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसर्‍या घटनेत दि. 3 जून रोजी साडेपाच ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान कराड-विटा मार्गावर ओगलेवाडी येथे राजपुरोहित बेकरीच्या समोर पार्किंग केलेली दुचाकी क्र. एमएच 50 डी 0942 ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार महेश शंकर शिंदे (रा. खोडशी, ता. कराड) यांनी कराड पोलीस ठाण्यात दिली आहे.
तिसर्‍या घटनेत दि. 26 जून रोजी 2 ते अडीच वा. सुमारास अलगुडेवाडी, ता. फलटण येथील अभिराम लॉन्स मंगल कार्यालय समोर पार्किंग केलेली दुचाकी क्र. एमएच 14 झेड 0020 अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार दादासाहेब रामचंद्र काळे (रा. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.