कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या एकाला सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
सातारा : कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्या एकाला सातारा वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत सातारा वन विभागाने दिलेली माहिती अशी, कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत मेढा रोड वर शेतामधील पाच झाडे विनापरवाना सोडून कोणतीही परवानगी न घेता त्याची ट्रक क्रमांक एम. एच.०९ ए ७५८३ मधून वाहतूक करीत असताना ट्रक चालक दिनकर भैरु बाबर हा आढळून आला. ट्रकसह त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर विनापरवाना झाडे तोडून त्याची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कोल्हापूर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी सागर गवते, वनीकरण विभागाचे वनसंरक्षक सुधीर सोनवले, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी निवृत्ती चव्हाण, वनपाल विशाल, पावरा वनरक्षक सुहास भोसले यांनी केली.


