अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास सुरज चव्हाण वय 20 (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


